धक्कादायक! प्रसिद्ध गायक केके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कोलकाता | सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नत्त उर्फ केके यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 53 वर्षांचे होते. कोलकता येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि ते अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

केके यांची बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांमध्ये गणती होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आतापर्यंत त्यांनी 200 हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत.

23 ​​ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांना केके म्हणूनच जास्त ओळखलं जायचं. 90 च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या यारो या गाण्याने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. केके यांनी रोमॅण्टिक गाण्यांसह पार्टी साँगपर्यंतची सर्व गाणी गायली आहेत.

केकेसर या जगात नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही, अशा शब्दात गायक अरमान मलिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्ता यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही- देवेंद्र फडणवीस 

“अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, पण दिल्लीसमोर झुकणार नाही” 

सर्व आमदारांसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा 

Hyundai ची Mahindra ला जोरदार टक्कर; ‘ही’ जबरदस्त कार लवकरच बाजारात येणार 

Avinash Bhosale | अविनाश भोसले यांना न्यायालयाचा झटका