भाजप आमदार मेधा कुलकर्णींमुळे पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या

पुणे | कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढलेल्या पहायला मिळाल्या. महाजनादेश यात्रेनिमित्त पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागलं.

मेधा कुलकर्णी यांनी लावलेल्या फ्लेक्समुळे अॅम्बुलन्सला रस्ता मिळाला नाही. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न केला. शहर विद्रुपीकरण करणाऱ्या फ्लेक्सबाजीला आपला पाठिंबा आहे का? आणि अॅम्बुलन्सला अडथळा निर्माण होईल अशी फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार का? अशी विचारणा त्यांना करण्यात आली.

शहरातील फ्लेक्स काढण्याचे आदेश मी यापूर्वीच दिले होते. शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी तशा सूचनाही संबंधितांना केल्या होत्या. पक्ष कारवाई करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, फ्लेक्सबाजी पाहून नव्हे तर काम पाहून आगामी विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळेल, असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिला.

महत्वाच्या बातम्या-