सांगलीत राजकीय भूकंप; काँग्रेसचा ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर??

सांगली : सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख हे काँग्रेसला रामराम ठोकत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सत्यजित देशमुख यांच्या भाजपप्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून ते सोमवारी महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय.

सत्यजित देशमुख यांनी भाजपप्रवेशाबाबत निर्णय घेण्यासाठी आज शिराळा येथे कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा आयोजित केल्याची माहिती आहे. त्यानंतर सोमवारी ते महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सत्यजित देशमुख यांच्याशी बोलणी सुरू असून त्यांना भाजपकडून शिराळा विधानसभा मतदारसंघातून लढवले जाऊ शकते.

दरम्यान, देशमुख यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला तर तो काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून हा सांगलीत मोठा राजकीय भूकंप असेल, असं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-