अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकमेकांना आग्रह, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) आज पुण्यात आहेत. मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेच्या (pune corporation) प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

मोदींनी पुण्यातील पहिल्या मेट्रोला (metro) हिरवा कंदिल दाखवला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते हजर होते.

मेट्रोच्या उद्घाटनावेळी एकमेकांवर टीका करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले.

फडणवीस-पवार यांच्यातील आदरतिथ्याचा हा फोटो सध्या व्हायरल होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रोला हिरवा कंदिल देण्यासाठी निघत होते. त्यामुळे नेते आणि अधिकारी त्यांच्याागे जायला निघाले.

मोदींच्या पाठीच समान जागेवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उभे होते. यावेळी अजितदादांनी हात पुढे करून फडणवीसांना पुढे येण्यास सांगितले. तर फडणवीसांनीही पवारांना तुम्ही पुढे जा असं हात करून सांगितलं.

दोन्ही नेते एकमेकांना मोदींच्या मागे जाण्यासाठी आग्रह करत असतानाचा हा फोटो नेमका कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मोबाईलवरुन मेट्रोचं तिकीट काढत मोदींचा मेट्रोतून प्रवास, दिव्यांग विद्यार्थ्यांसोबतही साधला संवाद 

पुणे महानगरपालिकेत नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण! 

ऑस्ट्रेलियन डायमंड अन् राजमुद्रा; मोदींच्या शाही फेट्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा 

“भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपाल पाहिले नाहीत” 

“ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर टीका केली, त्याच नेहरूंच्या धोरणाने नरेंद्र मोदींना वाचवलं”