मोबाईलवरुन मेट्रोचं तिकीट काढत मोदींचा मेट्रोतून प्रवास, दिव्यांग विद्यार्थ्यांसोबतही साधला संवाद

पुणे | आज पुणे मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट (Metro Ticket) काढलं आणि पुणे मेट्रोचा प्रवास करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले प्रवासी ठरले.

गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला. तत्पूर्वी मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडाही दाखवला.

पंतप्रधान मोदी यांनी गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास केला. तेव्हा त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लहान मुला मुलींनी पंतप्रधानांना यावेळी अनेक प्रश्न विचारले.

मोदींनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी मोदींनी दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. या मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या- 

पुणे महानगरपालिकेत नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण! 

ऑस्ट्रेलियन डायमंड अन् राजमुद्रा; मोदींच्या शाही फेट्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा 

“भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपाल पाहिले नाहीत” 

“ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर टीका केली, त्याच नेहरूंच्या धोरणाने नरेंद्र मोदींना वाचवलं” 

उद्धव ठाकरेंबाबत नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ