भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार?, फडणवीसांनी जरा स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

मुंबई | राज्याच्या हितासाठी भाजप आजही तयार असल्याचं असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे वक्तव्य चकीत करणार होतं. यावर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडून आम्हाला  भाजपला आला नाही. भाजप आता स्वत:च्या ताकदीवर यापुढे असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी बोलताना फडणवीसांनी पावसाळी अधिवेशन सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलं असल्याची माहिती दिली.

जीएसटी संदर्भात राज्य सरकारचे मंत्री आरोप लावत होते. केंद्राने 19 हजार 200 कोटी रुपयांचा जीएसटीचा परतावा महाराष्ट्राला दिला आहे. पीएम केअर फंडमधून सर्वात मोठी मदत महाराष्ट्राला झाली आहे. जीएसटीचा सर्वधिक परतावाही महाराष्ट्रालाच मिळाला. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राचे आभार मानायला पाहिजे असल्याचं  देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिनसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. मात्र आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आलो तरी आम्ही निवडणुका मात्र स्वबळावर लढणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं  होतं.

महत्वाच्या बातम्या-

“पंतप्रधानांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधात”

पार्थ पवार आमदार होणार का?; राष्ट्रवादीने केला खुलासा…

‘बकरी ईदला कुर्बानी द्यायचीच असेल तर आपल्या मुलांची कुर्बानी द्या’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य!

…तर आम्ही आजही पुन्हा शिवेसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत- चंद्रकांत पाटील

काय सांगता! ‘या’ कारणामुळे तुम्हाला आता भारतात पबजी खेळता येणार नाही!