“शिवस्वराज्य यात्रा भाजप-सेनेच्या सरकारचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही”

पाटोदा | राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज पाटोद्यामध्ये होती. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सेना भाजपवर कडाडून हल्ला चढवला. शिवस्वराज्य यात्रा भाजप-सेनेच्या सरकारचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले.

पाटोद्यातील सभेदरम्यान वरूणराजाने जोरदार हजेरी लावली. मात्र लोकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. धनंजय मुंडेच्या भाषणादरम्यान लोक टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना जोरदार प्रतिसाद देत होती.

मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या यात्रेला नावं ठेवत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांची यात्रा म्हणत आहेत. त्यांना माझं आव्हान आहे एका जाहीर मंचावर या, तुमच्या मंत्र्यांचे मी पुराव्यानिशी भ्रष्टाचार मांडतो. त्या मंत्र्यांवर कारवाई करण्याची तुमच्यात हिंमत आहे का?, असं मुंडे म्हणाले.

दरम्यान, सेना भाजपच्या कारभाराला लोक कंटाळली आहेत. यंदाच्या विधानसभेला परिवर्तन अटळ आहे, असंही मुंडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-