काश्मिरी महिलेचं राहुल गांधींजवळ गाऱ्हाणं; प्रियांका गांधी म्हणतात…

नवी दिल्ली | एका काश्मिरी महिलेनं विमान प्रवासादरम्यान राहुल गांधींजवळ काश्मिरी जनतेच्या समस्या सांगितल्या. त्यावर प्रियांका गांधींनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

हे किती काळ चालू राहिल? राष्ट्रवादाच्या नावाखाली कित्येक लोक पिचले जात आहे. जे लोक विरोधकांवर या विषयावर ‘राजकारण’ करतात असा आरोप करतात त्यांच्यासाठी या महिलेचे बोल चपराक आहेत, असं ट्वीट प्रियांका गांधींनी केलं आहे. 

कलम 370 हटवल्यानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांना काश्मिरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. काश्मिरमध्ये सगळं अलबेल आहे, असं भासवण्यात आलं. मात्र हा व्हिडीओ सगळं सत्य समोर आणतोय, असं प्रियांकांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काश्मिरमधली परिस्थिती अतिशय नाजूक आहे. माझा भाऊ हृदयविकाराने त्रस्त आहे. तो आपल्या मुलांना शोधायला गेला होता. त्यानंतर पुढची 10 दिवस तो गायब होता, असं त्या महिलेनं सांगितलं. त्यानंतर भावूक झालेल्या राहुल गांधींनी त्या महिलेला धीर द्यायचा प्रयत्न केला. 

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचं ट्वीट-

How long is this going to continue?This is one out of millions of people who are being silenced and crushed in the name of “Nationalism”.

For those who accuse the opposition of ‘politicising’ this issue: https://t.co/IMLmnTtbLb

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 25, 2019

महत्वाच्या बातम्या-