सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता… धनंजय मुंडेंची पडळकरांवर टीका

मुंबई |  भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय जहरी टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीत वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते पडळकरांचा समाचार घेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पडळकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.

राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

 

 

 

मंडल आयोग,नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून शरद पवार साहेबांनी आम्हा बहुजनांच्या आयुष्याचं सोनं केलं हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही.पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात हे वाईट वाटतं, असंही मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील, अशी जहरी टीका पडळकर यांनी पवारांवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बिरोबाची शपथ घेऊन बाप बदलणारी औलाद…. राष्ट्रवादीचं जशास तसं प्रत्युत्तर

-भारताचा विकास होऊ नये ही चीनची इच्छा – राज्यवर्धन राठोड

-हा कसला गोपीचंद हा तर छिछोरचंद!, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पडळकरांचा समाचार

-सुशांतने मृत्यूपूर्वी नोट लिहिली असणार; ‘या’ अभिनेत्याने केली CBI चौकशीची मागणी

-६४ एन्काउंटर करणाऱ्या माजी पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं…