काल झालेला आमदार पवारसाहेबांवर टीका करतो तर… मनसेकडून पडळकरांचा समाचार

मुंबई | शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तसंच मनसेने देखील पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

राजकारणातील एवढी नीच पातळी गाठून मिळणार काय? आम्ही ही विरोधक म्हणून काम करतो पण एवढी नीच पातळीवर घसरू नये, असा सल्ला मनसे नेत्या रूपाली पाटील यांनी पडळकरांना दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, शरद पवार साहेब हे महाराष्ट्राला लाभलेले मौल्यवान रत्ने आहेत. शरद पवार साहेब राजकारणातील जेष्ठ नेते आहेत राजकारणात त्यांची पूर्ण हयात गेली आहे आणि कालचा झालेला आमदार जर अशी घाणेरडी टीका करत असेल तर हे अशोभिनय आहे, असं रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.

टीका विचारांची देवाण घेवाण वेगळी… विरोधक म्हणून टीका ही मान्य पण अशी पातळी सोडणे म्हणजे विकृती एवढा नीच पणा राजकारणात आणून राजकारण अजून बदनाम करू नका असं म्हणत तुम्हाला बिरुबाची शपथ आहे असा टोलाही त्यांनी पडळकरांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता… धनंजय मुंडेंची पडळकरांवर टीका

-बिरोबाची शपथ घेऊन बाप बदलणारी औलाद…. राष्ट्रवादीचं जशास तसं प्रत्युत्तर

-भारताचा विकास होऊ नये ही चीनची इच्छा – राज्यवर्धन राठोड

-हा कसला गोपीचंद हा तर छिछोरचंद!, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पडळकरांचा समाचार

-सुशांतने मृत्यूपूर्वी नोट लिहिली असणार; ‘या’ अभिनेत्याने केली CBI चौकशीची मागणी