लातूर | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना प्रेमानं त्यांचे कार्यकर्ते धनुभाऊ म्हणतात. याच धनुभाऊंचा दिलखुलास अंदाज एका लग्नात पाहायला मिळाला आहे.
लग्नात नवरा नवरीसोबत वरातीत धनुभाऊ थिरकले. यावेळी त्यांच्या भन्नाट स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केलाय. धनुभाऊंनी या लग्नात केलेला डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. यात बेभान होऊन धनंजय मुंडे लग्नाच्या वरातीचा आनंद घेताना दिसले आहेत.
सर्वसामान्य माणसाप्रमाणे लग्नाच्या वरातीत उत्साहानं नाचणारा एक जण असतोच. या लग्ना ती व्यक्ती म्हणजे धनंजय मुंडेच होती की काय, असा प्रश्न तुम्हाला त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून होऊ शकतो.
दरम्यान, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाची तेजश्री वामनराव केंद्रे यांच्या विवाहानिमित्त उपस्थित राहिले होते. दोघांनीही नवदांपत्यांना शुभाशीर्वाद दिला. एवढंच नाही तर विवाहस्थळी दोघाही बहीण भावांनी एकमेकांच्या हाताला जोरदार टाळी दिली.
पंकजा मुंडे यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्या लहान मुलीला जवळ घेत प्रेमाने विचारपूस केली. एरवी राजकारणात कट्टर शत्रू असलेले मुंडे भावंडं आज हसतमुख होऊन एकत्रित आल्याचे हे सर्व क्षण बऱ्याच दिवसांनंतर दिसून आलं. मुंडे भावा बहिणींमधील हे क्षण कॅमेरात कैद झाले आहेत.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहीवरे यांचा विवाहसोहळा लातूर येथे पार पडला. या विवाह सोहळ्यात कोविड विषयक नियमांचं पालन करण्यात आलं.
दरम्यान, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि मुंडे परिवार एकत्रित दिसून आलेत.
धनंजय मुंडे याचा लग्नातला डान्स व्हायरल.. भाऊ.. भाऊ.. काय नाचलाय भाऊ…! pic.twitter.com/jWRVez4nTW
— Siddhesh Sawant (@ssidsawant) February 7, 2022
महत्वाच्या बातम्या-
“भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी…”
महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?; ठाण्यातील पोस्टरची राज्यभर चर्चा
“तुम्ही मोठं पाप केलंय”; संसदेत नरेंद्र मोदींचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
संसदेत नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले “टुकडे टुकडे गँगची लीडर…”