उशिरा का होईना सत्याचा विजय झाला; परळीकरांच्या भेटीआधी धनंजय मुंडें झाले भावूक

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परळीत जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर परळी नटली असून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. याआधी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उशिरा का होईना सत्याचा विजय झाला आहे. सत्याच्या मागे नियती उभी राहिली याचा मला आनंद आहे.  हा इमानदारीचा चमत्कार असल्याचं मुंडे म्हणाले आहेत. पूर्वी मी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होतो, आता मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक राहीन, असा शब्द त्यांनी दिला आहे.

परळीत येण्याबाबत उत्सुकता आहे. परळीकरांना-बीडकरांना निवडणुकीत जो शब्द दिला आहे, तो पूर्ण करणार आहे. परळी-बीडच्या जनतेचं उत्पन्न दुप्पट करणं हे माझं ध्येय आहे, असंही ते म्हणाले आहेत.

मुंडेसाहेब विरोधी पक्षनेते म्हणून पहिल्यांदा भगवान गडावर गेले तेव्हा त्यांनाही विरोध झाला होता, त्यांच्याही ताफ्यावर दगडफेक झाली होती, मात्र नंतर भगवान गडावर अभूतपूर्व स्वागत झालं, माझ्याबाबतही तसंच घडलं, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-