मंत्री धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला, म्हणाले…

मुंबई | पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या, त्यांच्या काळात विकास कामे झालीच नाहीत, जी झाली ती अर्धवट आहेत. आता ही अर्धवट विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आल्याची टीका सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचं नाव न घेता केली आहे.

विकास कामावर कळस चढवण्याची संधी जनतेने आम्हाला द्यावी, असं धनंजय मुंडे म्हणालेत. यावेळी बोलताना धंनजय मुंडे यांनी रेल्वेच्या रखडलेल्या कामाच्या मुद्द्यावरून देखील पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनेक दिवस झाले रेल्वेचे काम रखडलं होतं. मात्र आता रेल्वेच्या कामासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या काही दिवसांतच या मार्गावरून सुपर फास्ट ट्रेन धावेल असं त्यांनी म्हटलं आहे.

जिल्ह्यात रेल्वे कधी येणार याची वाट पाहात अनेक पिढ्या गेल्या, मात्र आता तुमचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचं यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर घणाघाती टीका केली होती. यांना ऊसतोड कामगारांचे काहीही देणंघेणं नाही, फक्त निवडणुका आल्यावरच त्यांना ऊसतोड कामगार आठवतात अशी टीका त्यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या- 

‘…तर परिस्थिती चिंताजनक होईल’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली ‘ही’ भीती 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, म्हणाले… 

“राज्यपालांचं उत्तर नाही आलं तरी अध्यक्षपदाची निवडणूक होणार” 

“अजित पवार यांनी दरडावून नाही तर समजावून सांगावं”

मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार