एलआयसीची भन्नाट योजना; 1 रुपयाच्या गुंतवणुकीतून मिळवा कोट्यवधीचा फायदा

मुंबई | एलआयसीची एक योजना विशेष लोकप्रिय आहे. या योजनेत तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीतून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. या विमा योजनेतून सुरक्षा (Security) आणि बचत (Savings) असे दोन्ही हेतू साध्य होतात. एका रुपयाच्या गुंतवणुकीतूनही तुम्ही मोठा फायदा मिळवू शकता.

एलआयसीच्या जीवन शिरोमणी योजनेच्या (LIC Jeevan Shiromani Scheme) माध्यमातून तुम्ही चांगला फायदा मिळवू शकता. एलआयसी जीवन शिरोमणी योजना 19 डिसेंबर 2017 रोजी सुरू झाली.

ही एक नॉन लिंक्ड, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. या योजनेतून गंभीर आजारांसाठीदेखील विमा सुरक्षा मिळते. तसंच ही मार्केट लिंक्ड प्रॉफिट स्कीम आहे. हाय नेट वर्थ असलेल्या ग्राहकांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

एलआयसी आपल्या ग्राहकांना त्यांचं जीवन सुरक्षित करण्यासाठी अनेक चांगल्या विमा योजना उपलब्ध करून देत असते. त्यापैकी एलआयसीची जीवन शिरोमणी विमा योजना एक नॉन लिंक्ड प्लॅन आहे. यामध्ये संबंधित विमाधारकाला किमान 1 कोटी रुपयांची हमी मिळते.

तुम्ही 14 वर्षांच्या कालावधीसाठी एक रुपया जमा केला, तर तुम्हाला एकूण 1 कोटींपर्यंत परतावा मिळेल. हप्त्याविषयीच्या अधिक माहितीसाठी अधिकृत एलआयसी एजंटशी संपर्क साधावा किंवा वेबसाइटवर माहिती पाहावी.

जीवन शिरोमणी प्लॅन पॉलिसी कालावधीदरम्यान विमाधारकाच्या कुटुंबाला डेथ बेनिफिटच्या (Death Benefit) स्वरूपात आर्थिक साह्य मिळतं. पॉलिसी मॅच्युरिटीवेळी एकरकमी परतावा विमाधारकाला मिळतो.

दरम्यान, आजच्या काळात बचतीला आणि गुंतवणुकीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यासाठी अनेक पर्यायदेखील उपलब्ध आहेत. भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीच्या (LIC) विविध योजना सुरक्षित आणि खात्रीशीर समजल्या जातात.

महत्वाच्या बातम्या- 

‘…तर परिस्थिती चिंताजनक होईल’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली ‘ही’ भीती 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, म्हणाले… 

“राज्यपालांचं उत्तर नाही आलं तरी अध्यक्षपदाची निवडणूक होणार” 

“अजित पवार यांनी दरडावून नाही तर समजावून सांगावं”

मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार