बळीराजाचं राज्य आलंय; धनंजय मुंडेंकडून कर्जमाफी योजनेचं स्वागत

बीड |महाविकासआघाडी सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या 15 हजार लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर झाली. एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर होऊन सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. जिल्हा पातळीवर अंमलबजावणीचं काम सुरू झालं आहे. बळीचं राज्य आलं, असं म्हणत धनंजय मुंडेंनी योजनेचे स्वागत केलं.

पहिल्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीत बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील 70 शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यामुळे कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आमच्या भागातील शेतकऱ्याला या कर्जमाफीमुळे नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला.

दरम्यान,  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावं आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘सहकार बचाव पॅनल’ ला धुळ चारत अजित पवारांनी राखलं वर्चस्व

-वंचितला झटका; शरद पवारांच्या उपस्थितीत 500 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

-नाव शेतकऱ्यांचं, पैसा जनतेचा आणि तुंबड्या भरल्या कंत्राटदारांच्या; जलयुक्त शिवारवर काँग्रेसची टीका

-भीमा कोरेगावप्रकरणात शरद पवार यांची साक्ष होणार

-फक्त सरपंचच नाही तर मुख्यमंत्रीदेखील जनतेतून पाहिजे; अण्णा हजारेंची मागणी