‘सहकार बचाव पॅनल’ ला धुळ चारत अजित पवारांनी राखलं वर्चस्व

बारामती | बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील 21 जागांपैकी 7 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलनं बाजी मारली आहे.

अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने निकाल लागलेल्या 7 जागांमधील 6 जागांवर आपलं वर्चस्व राखलं आहे. पवारांच्या ‘निळकंठेश्वर पॅनल’ने रंजन तावरे यांच्या ‘सहकार बचाव पॅनल’चा धुळ चारणार असल्याच दिसत आहे.

‘सहकार बचाव पॅनल’च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतल्यामुळे काही काळ मतमोजणी थांबली. त्यामुळे अद्यापही मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, या  निकालासह अजित पवार यांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा राखली आहे. बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी रविवार 23 फेब्रुवारीला मतदान झालं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-वंचितला झटका; शरद पवारांच्या उपस्थितीत 500 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

-नाव शेतकऱ्यांचं, पैसा जनतेचा आणि तुंबड्या भरल्या कंत्राटदारांच्या; जलयुक्त शिवारवर काँग्रेसची टीका

-भीमा कोरेगावप्रकरणात शरद पवार यांची साक्ष होणार

-फक्त सरपंचच नाही तर मुख्यमंत्रीदेखील जनतेतून पाहिजे; अण्णा हजारेंची मागणी

-‘कर्ज फिटलं साहेब, पोरीच्या लग्नाला या’; अजितदादांचा आपुलकीचा प्रश्न… कुठं दिलं लेकीला?