बीड | जानेवारी महिन्यात भगवान बाबांची पुण्यतिथी होती. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्या मोठ्या भावाशी रक्ताचं नातं तोडण्याची भाषा केली होती. त्यामुळे स्वाभाविक आहे की, पक्षामध्ये काहीच स्थान राहिलं नव्हतं. त्यामुळे मला तो निर्णय घ्यावा लागला, असं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परळीत गेले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली.
तो निर्णय घेतल्यानंतर अनेकजण म्हणाले की, असा निर्णय का घेतला? कशासाठी निर्णय घेतला? हाच पक्ष का? तोच पक्ष का? बेईमान, गद्दार, खलनायक म्हणून पाच वर्ष बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मी वावरलो. त्यानंतर आज ही जबाबदारी मिळत आहे, हे दिवस येत आहेत, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
दरम्यान, मंत्री झाल्यानंतर परळीत येण्याची उत्सुकता होती. निवडणुकीत परळी-बीडच्या जनतेला जो शब्द दिला आहे तो येत्या पाच वर्षात पूर्ण करणार आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यात थोरातांना यश- https://t.co/xLypJK0DdW @VijayWadettiwar @bb_thorat @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात जमा होणार 15 हजार रुपये; जगनमोहन रेड्डींची मोठी घोषणा – https://t.co/HkwEMu71Iv @ysjagan @BJP4India @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
‘छपाक’ चित्रपटाच्या यशासाठी दीपिका पादुकोण बाप्पाच्या चरणी – https://t.co/C9MrWWstEj @deepikapadukone @RanveerOfficial
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020