डीआयजी विनयभंग प्रकरणाला नवं वळण; मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरच्या नावे पीडित कुटुंबाला धमकी

मुंबई | डीआयजी निशिकांत मोरे अल्पवयीन तरुणीच्या विनयभंग प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रायव्हर बोलत असून या प्रकरणात गप्प रहा’, अशी धमकी मिळाल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मोटार ट्रान्सपोर्ट विभागाचे डीयाजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. तक्रार करणारी मुलगी सुसाईट नोट लिहून घरातून तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. चिठ्ठीमध्ये तरुणीने मी आत्महत्या करत असून माझ्या हत्येला मोरे जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने धमकी येत असल्याचा आरोप पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. दिनकर साळवे असं धमकी देणाऱ्या ड्रायव्हरचं नाव असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी निशिकांत मोरे यांनी पीडित मुलीच्या वाढदिवसाला आले असताना विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीने तक्रार दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

DI