CAA चं समर्थन करत जुही चावलाकडून मोदींचं तोंडभरून कौतुक

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाही मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. जुही चावलाने सीएएचं समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. येथे असे किती जण उपस्थित आहेत ज्यांनी पाच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. फक्त एकच अशी व्यक्ती आहे ज्याने पाच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही ते म्हणजे आपले पंतप्रधान, असं म्हणत जुही चावलाने मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

मी कोणत्याही पक्ष किंवा राजकारणाबद्दल बोलत नसून एका सामान्य व्यक्तीबद्दल बोलत आहे जे आपले पंतप्रधान आहेत. ते नेहमी आपल्या देशाच्या विकासाबद्दल बोलत असतात. देशासाठी काय केलं जाऊ शकतं याचाच विचार ते नेहमी करत असतात, असं जुही चावलाने म्हटलं आहे.

सरकारवर वारंवार टीका करण्यापेक्षा, प्रत्येकाने आपण कसे वागत आहोत याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच बोलताना फूट पाडण्याऐवजी एकत्र येण्यावर बोललं पाहिजे असं परखड मत जुही चावलाने मांडलं आहे.

दरम्यान, जुही चावलाने मुंबईत भाजपकडून आयोजित निषेध कार्यक्रमात हजेरी लावली. तुकडे तुकडे गँगकडून काश्मीर मुक्त करण्याच्या घोषणा दिल्या जात असल्याचा निषेधार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-