“हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता, मग…”

पुणे | हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता, मग तुम्हाला या हल्ल्याची किंमत कळाली असती असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी केलं आहे. दिलीप मोहिते पाटील हे पुण्यातील खेड-आळंदीचे आमदार आहेत.

परिवहन मंत्रीपद हे शिवसेनेच्या अनिल परब यांच्याकडे आहे. त्यामुळे या विषयाशी पवार साहेबांचा दुरान्वये संबंध नाही. तरीही काही शक्तींनी कालच कृत्य केलं, असं दिलीप मोहिते म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचा सर्वात मोठा वाटा आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला अस्थिर करण्यामागे या शक्ती लागलेल्या आहेत, असंही मोहितेंनी पुढे म्हटलंय.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुक्रवारी रात्री अॅड. गुणरत्न सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अॅड. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावताना इतर 109 जणांना मात्र न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यानंतर राज्यभर तणावाचं वातावरण आहे.

या घटनेच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहे. या हल्ल्यासाठी सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

“आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही” 

अखेर इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हाकलपट्टी!

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी एक मोठी कारवाई 

  Maharashtra Kesari 2022: कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

  Gold Rate : सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा ताजे दर