…म्हणून मी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली अन् शिवसेनेत प्रवेश केला- दिलीप सोपल

मुंबई |  राजकारण करताना शेवटी जनभावनेचा आदर करावा लागतो आणि हीच जनभावना लक्षात घेता मी राष्ट्रवादी सोडून आज शिवसेनेत प्रवेश केला आहे, असं राष्ट्रवादीचे राजीनामा दिलेले बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी म्हटलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत सोपल यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी  पवार साहेबांना सोडून जाण्याचा मला गम नाहीये पण माझ्या मनात नक्कीच हुरहूर आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

कार्यकर्त्यांनी आणि मित्रांनी मला हा निर्णय घेण्यास सांगितले म्हणून मी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला, असंही सोपल यावेळी म्हणाले. 

दरम्यान, 23 वर्षांनी शिवसेनेत प्रवेश करतोय याचा मला आनंद आहे आणि चांगलं देखील वाटतंय, असं सोपल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-