शरद पवारांना आणखी 1 धक्का… या आमदाराचा उद्या शिवसेनेत प्रवेश!

मुंबई |  माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उद्या ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. सोपल यांच्यासह सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही शिवसेना प्रवेश होणार आहे.

राष्ट्रवादीवर मी नाराज नाही किंवा पक्षनेतृत्वावर मी अजिबात नाराज नाही. जनभावनेचा आदर करत मी शिवसेनेत जात आहे, असं स्पष्टीकरण सोपल यांनी दिलं आहे. शिवसेनेत मिळेल ती जबाबदारी मी सांभाळायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, सोपल यांच्याअगोदर करमाळ्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनीही शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला होता.

महत्वाच्या बातम्या-