“मुंडेसाहेबांनंतर देवेंद्र फडणवीस माझे गुरू; त्यांना अंगठाही द्यायला तयार”

बीड |  माझे वडिल गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच माझे गुरू आहेत, असं वक्तव्य महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा सोमवारी बीडमध्ये पोहचली. यावेळी पंकजा मुंडे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं.

गुरूसाठी अंगठा कापून देणाऱ्या परंपरेतील आपण आहोत. मुख्यमंत्र्यांसाठी मी अंगठाही द्यायला तयार आहे, असं पंकजा म्हणाल्या. तुम्ही जीवनात खूप यशस्वी व्हा. तुमच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू, असा शब्द त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीवर कडाडून हल्ला चढवला. राष्ट्रवादीची अवस्था अशी करा, की त्यांच्या तिकिटावरही पुन्हा कुणाची निवडणूक लढवायची हिम्मत नाही झाली पाहिजे, असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना केला.

महत्वाच्या बातम्या-