“राणेंना भाजपमध्ये घेणं म्हणजे भाजप-सेना युतीत मिठाचा खडा टाकण्यासारखं”

मुंबई : स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. नारायण राणे देखील भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक असल्याचं समजतंय. आता याबाबत शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.

नारायण राणेंना भाजपमध्ये घेणं म्हणजे युतीत मिठाचा खडा टाकण्यासारखं आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. यामुळे नारायण राणेंना आत्तापासूनच शिवसेनेनं विरोध करणं सुरु केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात किती चांगलं नातं आहे. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पुढे देखील ते असेच निर्णय घेत राहतील. ते अशा लोकांना पक्षात घेणार नाही, असं म्हणत दिपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राणेंना जर भाजपमध्ये प्रवेश मिळाला तर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असू शकतो, असं बोललं जात आहे. यामुळे आता भाजप शिवसेनेचं ऐकणार की विरोध झुगारुन राणेंना भाजपमध्ये प्रवेश देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-