अहमदनगर : साकळाई पाणी योजनेबाबत डॉ. सुजय विखे यांनी माझ्याबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं असून, त्यांनी माझी माफी मागावी. नाहीतर याबाबत मी महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे, असा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिला आहे.
सुजय विखेंनी साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना देखणा माणूस आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. यावर दिपाली सय्यद यांनी आक्षेप घेतला आहे.
सुजय विखे डॉक्टर असून सुजाण नागरिक आहेत. ते खासदार असून त्यांच्या घराण्याचे संस्कारसुद्धा त्यांच्यावर आहेत. एक व्यक्ती म्हणून त्यांनी असं वक्तव्य करणं योग्य नाही. याबाबत त्यांनी माझी माफी मागावी, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे यांनी मला बहीण मानलं आणि माझ्याकडे पाठिंबा मागितला होता. त्यांना मी पाठिंबाही दिला मात्र आता साकळाईचं श्रेय घेण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारं आहे, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सुजय विखे यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागणे गरजेचे आहे. अन्यथा, महिला आयोगाकडे तक्रार करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या-
…तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा- उद्धव ठाकरे – https://t.co/GUb951fMuc @ShivSena @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019
“ममता दीदी सांभाळून बोला, नाहीतर तुमचाही चिदंबरम करू”-https://t.co/kLxH1znRHW #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019
जेष्ठ काँग्रेस नेते बी. जे. खताळ यांचं निधनhttps://t.co/VkzZwRDthP
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019