संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला; भाजप प्रवेशाच्या चर्चेला उत

नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणुकांच्या हंगामात सत्ताधारी पक्षाची वाट धरलेली असतानाच बॉलिवूडमधलं एक मोठं नाव सत्ताधारी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अभिनेता संजय दत्त याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतलेली भेट या चर्चांना निमित्त ठरलं.संजय दत्तने नागपूरमध्ये नितीन गडकरी यांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं संजय दत्तने म्हटलं असलं, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या चर्चेला जोर आला आहे.

वडील दिवंगत अभिनेते सुनिल दत्त आणि बहीण प्रिया दत्त हे दोघंही काँग्रेसचे खासदार राहिलेले असताना संजय दत्तने भाजपने नेत्याची भेट घेणं आश्चर्यचकित करणारं होतं.

गेल्याच महिन्यात ‘राष्ट्रीय समाज पक्षा’चे नेते महादेव जानकर यांनी अभिनेता संजय दत्त आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याची दावा केला होता.

संजय दत्त रासपच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्येच पक्षप्रवेश करणार होता. त्याने सप्टेंबर महिन्याची तारीख दिली आहे, असा दावा त्यावेळी जानकरांनी केला होता. परंतु आपण कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होणार नसल्याचं त्यावेळी संजय दत्तने स्पष्ट केलं होतं. 

 

महत्वाच्या बातम्या- 

“ममता दीदी सांभाळून बोला, नाहीतर तुमचाही चिदंबरम करू”-https://t.co/kLxH1znRHW #म