चित्रपट सृष्टीवर पुन्हा पसरली शोककळा! आणखी एका बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

मुंबई |  चित्रपट सृष्टीसाठी 2020 हे वर्ष अतिशय वाईट ठरलं आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला आहे. अशातच आता मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का बसला आहे. चित्रपट सृष्टीतील आणखी एका महान दिग्दर्शकाने शुक्रवारी या जगाचा निरोप घेतला आहे.

फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय रेड्डी यांचं शुक्रवारी वयाच्या 84व्या वर्षी निध.न झालं आहे. विजय रेड्डी हे कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील एक गाजलेलं नाव आहे. रेड्डी यांच्या निध.नानं फिल्म इंडस्ट्रीवर एकच शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विजय रेड्डी यांची प्रकृती खालावली होती. यामुळे चेन्नई येथे त्यांच्यावर उपचार देखील चालू होते. गेल्या काही दिवसांपासून मृ.त्यूशी झुंज देणाऱ्या रेड्डी यांची शुक्रवारी अखेर मृ.त्यूशी झुंज थांबली आणि चेन्नई येथे त्यांच नि.धन झालं आहे.

विजय रेड्डी यांच्या निध.नाच्या बातमीने कन्नड चित्रपटाच्या चाहते वर्गाला मोठा धक्का बसला आहे. रेड्डी यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धां.जली वाहिली आहे.

विजय रेड्डी हे मुळचे आंध्र प्रदेश मधील आहेत. रेड्डी यांचं बालपण अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात गेलं. रेड्डी यांनी कामाच्या शोधात मद्रास गाठले होते. यानंतर त्यांनी मद्रास मध्येच आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. पुढे कन्नड चित्रपट सृष्टीत त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ख्याती मिळवली.

रेड्डी यांनी कन्नडमध्ये एकापेक्षा एक उत्तम चित्रपट बनवले आहेत. त्यांच्या नावावर कन्नड मधील हिट चित्रपटांची एक यादीच आहे. रेड्डी यांचा 1970 मध्ये आलेला ‘रंगमहाल रहस्य’ हा चित्रपट विशेष गाजला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळच घातली होती.

जवळपास 37 कन्नड चित्रपट रेड्डी यांनी दिग्दर्शित केले आहेत. कन्नड चित्रपटाबरोबरच त्यांनी काही हिंदी आणि तेलगू चित्रपट देखील बनवले आहेत. विजय रेड्डी यांनी 16 हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच त्यांनी 12 तेलगू चित्रपट देखील दिग्दर्शित केले आहेत.

अभिनेता पुनीत राजकुमार याने देखील सोशल मीडियावरून रेड्डी यांच्या नि.धनाचे दुःख व्यक्त करत त्यांना श्र.द्धांजली वाहिली आहे. त्याने ट्वीटरवरून रेड्डी यांच्या सोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आता कंगणा राणावत नव्या वादात; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

रंगीन ख्रिस गेल… क्रिकेटसोबतच ‘या’ गोष्टीचाही लुटतोय मनमुराद आनंद!

बाप मजूर, आई चालवते दुकान; खेळायला मिळत नव्हता साधा बॉल, बनला याॅर्कर किंग!

वडील चर्मकार, आई करते मजुरी; मराठी मुलानं उभारलं असं साम्राज्य, आता करोडोची उलाढाल!

आई-वडिलांनी भाजीपाला विकून शिकवलं, पोरीनं साऱ्या राज्यात त्यांचं नाव करुन दाखवलं!