मुंबई | अभिनेत्री रेखा नेहमीच तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या इतरही काही गोष्टींमुळे चर्चेत असते. रेखाचे अनेक चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. रेखानं लग्न केलेलं नसतानाही तीनं कित्येकवेळा आपल्या भांगेत सिंदूर लावलेलं दिसलं आहे.
लग्न न करताही रेखा सिंदूर का लावते?, हा सवाल अनेकांना सतत पडतो. अनेकवेळा माध्यमांनी रेखाला हा प्रश्नसुद्धा विचारला आहे. मात्र, रेखानं केव्हाच या मुद्द्यावर उघडपणे भाष्य केलं नाही. मात्र, एका मुलाखती दरम्यान रेखानं कोणाचंही नाव न घेता सिंदूर लावण्यामागचं कारण सांगितलं होतं.
एका मुलाखती दरम्यान रेखां म्हटली होती की, मी माझ्या तारुण्यात एक स्वप्न पाहिलं होतं. माझंही लग्न होईल मी सुद्धा नवरी बनेल. लग्नानंतर माझीही काही मुलं असतील. मात्र, माझं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.
मी माझ्या आयुष्यात एका व्यक्तीवर खूप प्रेम केलं होतं. मात्र, माझं प्रेम पूर्ण होऊ शकलं नाही. माझ्या अधुऱ्या प्रेमासाठी मी सिंदूर लावत असते, असं रेखानं म्हटलं होतं. रेखानं यावेळी कोणाचंही नाव घेतलेलं नव्हतं.
रेखाच्या सिंदूर लावण्याच्या मुद्द्यावरून अनेकवेळा वा.द तयार झाला आहे. रेखाला अनेकवेळा सिंदूर लावण्याचं नेमकं कारण विचारण्यात आलं. मात्र, रेखानं केव्हाच या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही.
बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नात रेखानं प्रथम सिंदूर लावलं होतं. रेखानं यावेळी सिंदूर लावून एका नवीन नवरीप्रमाणे लग्नात एन्ट्री केली होती. रेखाच्या भांगेत सिंदूर पाहून यावेळी प्रत्येकचजण आश्चर्यचकित झाला होता.
काही काळापूर्वी महानायक अमिताभ बच्चन आणि रेखाची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत होती. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. मात्र, त्यांची ही प्रेम कथा पूर्ण होऊ शकली नाही. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नानंतर रेखाचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं.
दरम्यान, आज रेखाचा 66वा वाढदिवस आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार रेखाला प्रत्यक्ष भेटून अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. वयाची सहासष्ठी ओलांडत असतानाही रेखा तिच्या सौंदर्यानं आज देखील प्रेक्षकांना भुरळ घालत असते.
महत्त्वाच्या बातम्या-
चित्रपट सृष्टीवर पुन्हा पसरली शोककळा! आणखी एका बड्या दिग्दर्शकाचं नि.धन
आता कंगणा राणावत नव्या वादात; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
रंगीन ख्रिस गेल… क्रिकेटसोबतच ‘या’ गोष्टीचाही लुटतोय मनमुराद आनंद!
बाप मजूर, आई चालवते दुकान; खेळायला मिळत नव्हता साधा बॉल, बनला याॅर्कर किंग!
वडील चर्मकार, आई करते मजुरी; मराठी मुलानं उभारलं असं साम्राज्य, आता करोडोची उलाढाल!