आत्मनिर्भर कृषीविषयक पॅकेजच्या घोषणांवर शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…

मुंबई | आत्मनिर्भर कृषीविषयक पॅकेजवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज ज्या घोषणा आणि कृषीविषयक पॅकेज जाहीर करण्यात आलं ते निराशादायी आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

लॉकडाउनच्या काळात जे तणावात आहेत आणि ज्यांना तोटा सहन करावा लागला आहे तो भरुन काढण्याच्या दृष्टीने  एकही घोषणा करण्यात आली नाही. तसंच कृषी विषयक कर्जांबाबत किंवा कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सूट मिळण्याबाबत एकही घोषणा करण्यात आली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

कृषी विषयक कर्ज आणि त्यावर असणारे व्याजदर यामध्ये सूट देण्यात आलेली नाही हे निराशादायी चित्र आहे या आशयाचं ट्विट करुन शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आज सकाळीच कोरोनाच्या आपत्तीतून साखर कारखानदारीला सावरण्यासाठी तातडीने करता येतील अशा पाच गोष्टी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळवल्या होत्या.

 

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात बंदी!

-कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे- एकनाथ शिंदे

-“ठाकरे सरकार जेवढा खिळखिळं करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं हे सरकार मजबूत आणि गतीमान होईल”

-शेतकऱ्यांना आधार द्या; आंतरराष्ट्रीय रेटिंग आपोआप सुधारेल – राहुल गांधी

-कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकलेने लिहिलं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; पत्रात म्हणतो…