“सरकार बरखास्त करण्याची कारवाई झाली पाहिजे”

नवी दिल्ली | देशाच्या घटनात्मक रचनेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींना एक स्वतंत्र अस्तित्व आहे. केंद्र सरकार पंतप्रधानांच्या तर राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कार्य करत असतात.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाचा विचार करता त्यांना अतिउच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. त्यांना सध्या एसपीजी या अभेद्य सुरक्षा कड्याची व्यवस्था आहे.

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांचा पंजाबमध्ये दौरा होता. या दौऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खराब हवामानाचा दाखला देत रस्तेमार्गानं जाणं पसंत केलं.

रस्तेमार्गानं पंजाबमधील फिरोजपूर येथील रॅलीसाठी आणि काही विकास कामांच्या उद्घाटनांसाठी मोदी जात होते. तिथं अचानक रस्त्यावर शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला अडवल्यानं देशभर गोंधळ निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल 20 मिनीटं उड्डाण पुलावर वाट पहावी लागली होती. मोदी ज्या भागात अडकले होते तो भाग पाकिस्तान सिमेपासून काही अंतरावर असल्यानं त्यांच्या सुरक्षेमध्ये चुक झाल्याची टीका पंजाब सरकारवर होत आहे.

पंजाबमध्ये सध्या काॅंग्रेसचे चरणजीस सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर मोदींच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी असताना त्यांनी चुक केल्याची टीका भाजपनं केली आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तर आता चक्क पंजाब सरकार बसखास्त करण्याची मागणी केल्यानं सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत अक्षम्य चूक पंजाब सरकारची झाली आहे. त्यामुळे पंजाब सरकार बरखास्त करण्याची कारवाई झाली पाहिजे, असं आठवले म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणालाही घाबरत नाहीत. तर काँग्रेसच नरेंद्र मोदींना घाबरत आहे, या शब्दात आठवले यांनी काॅंग्रेसवर टीका केली आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत आमच्या सरकारनं कसलीही चुक केली नाही, असं पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी स्पष्ट शब्दात भाजपला सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधील गुतंवणूक केली कमी! 

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘ती’ पुन्हा येतेय…, टाटाची जबरदस्त कार लवकरच येणार बाजारात 

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार