संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं, म्हणतात…

नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगानं येत्या काही दिवसात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे.

गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या राज्यातील 690 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम घोषित करताना आयोगानं अनेक अटींचा समावेश केला आहे. प्रचारसभा, रॅली, नुक्कड सभा घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आयोगाच्या या निकालानंतर आता राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊ नयेत. मोदींनी इतरांना एक आदर्श घालून द्यावा, असं संजय राऊत म्हणाले आहेत. कोरोना नियमावलीवरून राजकीय पक्षांमध्ये जुंपली आहे.

काही महिन्यांपूर्वी कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत असताना पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये मोदींनी गर्दीच्या सभा घेतल्या होत्या.

बंगालमध्ये निवडणुकीनंतर काय झालं हे अवघ्या देशानं पाहीलं आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचा विचार करायला हवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

निवडणूक आयोगानं घालून दिलेली नियमावली ही सर्वांना सारखी असायला हवी. एका पक्षाला सोईची नको, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये चार राज्यात भाजपची सत्ता आहे तर एका राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे.

महत्वाच्या बातम्या –

किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले… 

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार

झटपट वजन कमी करायचंय? मग हिवाळ्यात भाकरी खा… होतील फायदेच फायदे

सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत रश्मिकाचं नाव, एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ कोटी