31 मार्चच्या आत करा ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा आर्थिक फटका

मुंबई | मार्च महिन्यात बँकिंग तसेच इतर आर्थिक बाबींसंदर्भातील सर्व महत्त्वापूर्ण कामे पार पाडावी लागतात. अन्यथा नंतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

बँकिंग केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. तुम्हालाही जर बँकिंग केवायसी अपडेट करायची असेल तर तुम्ही 31 मार्चपर्यंत बँकिंग केवायसी अपडेट करू शकता.

ज्यामध्ये बँकेत तुमचा रहिवासी पुरावा सादर करणं, अपडेट पॅक कार्ड किंवा आधार कार्ड सादर करणं किंवा इतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सादर करणं या कामांचा समावेश होतो.

केवायसीसाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. तुम्ही 31 मार्चपर्यंत बँकिंग केवायसी अपडेट करू शकत. त्यानंतर कदाचीत तुमच्याकडून दंड आकारण्यात येऊ शकतो.

जर तुम्ही आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आपली नोकरी बदलली आहे किंवा नवीन जॉबला सुरुवात केली आहे, तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नासंबंधिची माहिती फॉर्म 12B (Form-12B) मध्ये भरून तुमच्या कंपनीकडे सादर करणं बंधनकारक असते. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा टीडीएस (TDS) योग्यप्रमाणात कट होईल.

आयकर कायद (Income Tax Act) कलम 208 नुसार जर तुम्ही दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक टॅक्स जमा करत असाल तर तुम्ही हफ्त्यांनी देखील कराचा भरणा करू शकता. एकूण चार हफ्त्यांमध्ये आयकर जमा करायचा असतो. तुम्ही जर चौथा हफ्ता भरला नसेल तर तुम्ही 31 मार्चपर्यंत चौथा हफ्ता भरू शकता.

महत्त्वाच्या बातम्या- 

जो बायडन यांचा रशियाला झटका; केली ‘ही’ मोठी घोषणा 

मोठी बातमी! अजित पवारांकडून आमदारांना होळीचं मोठं गिफ्ट; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय 

Mr. IPL इस बॅक! ‘या’ नव्या इनिंगसह आयपीएलमध्ये रैनाची दमदार एन्ट्री 

 चीनमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर; मोदी सरकार अॅक्शन मोडवर

 Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये केमिकल वाॅर होणार???, जगाचं टेन्शन वाढलं