Russia Ukraine War | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली मोठी घोषणा!

न्यूयॉर्क | सध्या रशियाचा (Russia) युक्रेन (Ukraine) घशात घालण्याचा प्रयत्न सुरूय. हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर ठरणार नाही ना, अशी अनेकांना भीती वाटतं आहे. अमेरिकेनेही रशियाच्या आक्रमक भूमिकेवर आक्षेप घेतलाय. मात्र रशियाने आपले हे युद्ध सुरुच ठेवलं आहे.

रशिया युक्रेनमधील युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. जो बायडन यांनी युक्रेनला मदतीचं आश्वासन दिलं आहे.

आम्ही युक्रेनला 200 मिलियन डॉलर मदत पाठवली आहे आणि या आठवड्यात आणखी 1 बिलियन डॉलर मदत पाठवू, असं बायडेन यांनी सांगितलं आहे.

रशियाने मारिओपोलच्या हॉस्पिटलवर ज्या प्रकारे जोरदार बॉम्ब हल्ला केला. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये रशियाविरोधातील संताप वाढत आहे, असं बायडन म्हणाले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची धमकी आम्ही गांभीर्यानं घेतली आहे. त्यामुळेच आम्ही युक्रेनला आणखी धोकादायक शस्त्रे देण्याची तयारी केल्याचं बायडन म्हणालेत.

रशियन सैन्यानं मारिओपोलमधील रुग्णालयावर ज्या प्रकारे जोरदार बॉम्बफेक केली आहे, ते पाहून आम्ही युक्रेनला आणखी धोकादायक शस्त्रे देण्याचं ठरवलं आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्याच्या पाठीशी अमेरिका उभी असून युक्रेनच्या जनतेला सर्वतोपरी मदत करेल, असंही ते म्हणाले.

आपण सर्व मिळून लढूया जेणेकरून पुतिन यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. अमेरिका युक्रेनच्या नागरिकांच्या पाठीशी उभी आहे आणि यापुढेही उभी राहील. अमेरिका नेहमीच स्वातंत्र्यासाठी उभी राहिली आहे आणि ती त्याच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! अजित पवारांकडून आमदारांना होळीचं मोठं गिफ्ट; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय 

Mr. IPL इस बॅक! ‘या’ नव्या इनिंगसह आयपीएलमध्ये रैनाची दमदार एन्ट्री 

 चीनमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर; मोदी सरकार अॅक्शन मोडवर

 Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये केमिकल वाॅर होणार???, जगाचं टेन्शन वाढलं

“CD होती पण वेळ नव्हती, आता CD बाहेर काढणार”; एकनाथ खडसेंचा पुनरूच्चार