‘तुला बाॅयफ्रेंड आहे का?’ असं विचारणाऱ्या चाहत्याला आर्चीनं दिलं उत्तर, म्हणाली….

मुंबई|अनेक कलाकार चिञपटसृष्टीमध्ये येण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. त्यातच काही कलाकारांना खूप स्ट्रगल करावं लागतं तर काहींचं एका राञीतचं नशीब बदलून जात. असे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करतात.

मराठी चिञपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेञींपैकी एक अभिनेञी म्हणजे रिंकू राजगुरू. ‘सैराट’ या चिञपटामुळे रिंकूचं एका राञीचं नशीब बदलून गेलं. तेव्हापासून रिंकू नेहमी कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेचा विषय ठरत असते. यातच रिंकू आणखी एका कारणानं पून्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

सैराटमध्ये बिनधास्त ‘आर्ची’ची भूमिका साकारणाऱ्या आणि बेधकपणे परश्याला आय लव्ह यू बोलणाऱ्या रिंकूच्या खऱ्या आयुष्यातील बॉयफ्रेंड बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशात आता एका चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना रिंकूनं आपल्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला.

नुकतच रिंकूनं सोशल मीडियावर ‘आस्क मी एनीथिंक’ सेशल घेतलं होतं. यामध्ये तीनं अनेक चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. या सेशनमध्ये चाहत्यांनी रिंकूला तिचा आवडला पदार्थ, आगामी चित्रपट, आवडतं ठिकाण असे वेगवेगळे प्रश्न विचारले.

एका चाहत्यानं तिला ‘तुला बॉयफ्रेंड आहे का?’ असा प्रश्न विचारला आणि विशेष म्हणजे रिंकूनं त्याच्या या प्रश्नाचं उत्तरही दिलं. रिंकून या प्रश्नाचं उत्तर देताना ‘नाही’ असं म्हटलं आहे. म्हणजे आर्चीच्या खऱ्या आयुष्यातला परश्या अद्याप तिला भेटलेला नाही आणि ती सिंगल आहे. रिंकूची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे.

‘सैराट’ हा रिंकूचा पहिला चिञपट असून, या चिञपटामुळे तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मध्ये रिंकूने  आर्चीची भूमिका साकारली होती. तिनं साकरलेली आर्ची प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करुन गेली. प्रेक्षकांना आर्ची इतकी आवडली, की त्यांनी तिच्या भूमिकेमुळे तिला अगदी डोक्यावर घेतलं.

या चिञपटातील रिंकूने केलेल्या आर्चीच्या भूमिकेमुळे एका राञीत तिचं नशीब बदलून गेल. सैराट हा चिञपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला असून अजूनही आर्चीने त्या पाञामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवलं आहे.

सैराट नंतर रिंकू कागर, मेकअप या चिञपटांमध्ये झळकली. तसेच हंड्रेड आणि अनपॉज्ड यांसारख्या हिंदी प्रोजेक्ट मध्ये सुद्धा दिसून आली. कागर आणि मेकअप या दोन्ही चिञपटांमध्ये तिची भूमिका आर्चीच्या भूमिकेच्या पूर्ण विरुद्ध होती.

दरम्यान, रिंकू नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चिञपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच समीर जोशींचा ‘छुमंतर’ आणि गजेंद्र आहिरे यांचा ‘पिंगा’ या चिञपटात दिसणार आहे.

rinku rajguru1

महत्वाच्या बातम्या – 

अभिनेत्री वैदेही परशुरामीनं खरेदी केली ‘ही’ नवी…

कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्रीनं घेतली कचरापेटीत…

ज्या ड्रेसमुळे ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा ट्रोल…

मौनी रॉयच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा…

करीना कपूरला झोपताना हव्या असतात ‘या’ तीन…