तुम्ही तुमच्या गाडीला हवा भरता का? तर मग तुम्ही हा व्हिडीओ नक्की पहायला हवा

नवी दिल्ली | आपल्यापैकी अनेकांनी आजपर्यंत एकदा का होईना गाडीच्या टायरमध्ये हवा भरली असेलच. टायरमध्ये हवा भरताना मीटरचा वापर करतात. यामुळे टायरमध्ये नेमकी किती हवा आहे याचा अंदाज आपल्याला येतो. मात्र, टायरमध्ये हवा भरताना मीटरचा वापर न करणे दोन व्यक्तींच्या चांगलंच अं.गलट आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन व्यक्ती टायरमध्ये हवा भरत होते. मात्र, त्यांना टायर मधील हवेचा अंदाज येत नाही आणि तो टायर फु.टतो.

हा व्हिडीओ नेमका कोणत्या शहरातला आहे, हे समजू शकलं नाही. मात्र, देरेक नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओवर कॅप्शन देत हवा भरताना सावध राहण्याचं आ.वाहन देखील केलं आहे.

एका मोठ्या टायरमध्ये दोन व्यक्ती हवा भरत असल्याचं यामध्ये दिसत आहे. मात्र, या मोठ्या टायरमध्ये हवा जास्त होती आणि तो टायर फु.टतो. टायर फु.टल्यानंतर दोन्ही व्यक्ती हवेत उडून लांब पडतात आणि तो टायर देखील हवेत उडतो.

आसपास असणाऱ्या लोकांना एका क्षणासाठी काय घडलं हे समजत नाही. मात्र, नंतर सर्व लोक तिथे गोळा होतात. यानंतर दोन्ही व्यक्ती घाबरून लांब निघून गेल्या.

दरम्यान, आपल्यापैकी बरेचजण अनेकवेळा टायरमध्ये हवा भरत असतात. यामुळे प्रत्येकवेळी टायरमधील हवेचा अंदाज घेऊन हवा भरली पाहिजे. टायरमध्ये हवा जास्त झाल्यास अशी घटना आपल्यासोबत देखील घडू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-