ओवा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?; जाणून घ्या!

मुंबई | ओवा तर सामान्यपणे अनेकांच्या घरात आढळतो. जर कोणत्या डाळीचं पीठ बनवायचं असेल तर गृहिणी आवर्जून त्यामध्ये ओवा टाकतात. तसेच जर केव्हा अचानक पोट दुखू लागलं तर घरातील वृद्ध महिला ओवा खाण्याचा सल्ला देतात. ओव्यानं पोटदुखी थांबते असं म्हटलं जातं. पण या व्यतिरिक्त ओव्याचे आणखीही काही फायदे आहेत.

पोटात आग होत असेल किंवा जळजळ होत असेल तर ओवा, बडीशेप आणि जेष्ठमध एकत्र करून त्याचं सेवन करावं, यामुळे पोटातील जळजळ कमी होते. तसेच लहान बाळांचे जर पोट दुःखत असेल तर ओव्याचा अर्क बाळाच्या बेंबीभोवती चोळून बाळाचे पोट शेकावं, त्यामुळे लहान बाळांची पोटदुखी कमी होते.

जर सतत लघवी होत असेल तर सामान्यपणे घरात आढळणारा गूळ आणि ओव्याचं चूर्ण एकसारख्या प्रमाणात घेऊन त्याच्या लहान लहान गोळ्या बनवाव्यात. या गोळ्या दर 4 तासांनी खाव्यात यामुळे सतत लघवी होण्याचा त्रास कमी होतो.

पोटदुखी, शौचास न होणे किंवा पोट फुगणे या तक्रारी जर तुम्हाला नेहमीच असतील तर रोज चिमूटभर ओवा आणि सैंधव मीठ एकत्र करून खावे, यामुळे या सर्व तक्रारी नाहीशा होतात. ओवा खाल्ल्यानंतर कायम पाणी प्यावे. कारण ओवा उष्ण असल्यानं बऱ्याच वेळा तोंड येण्याची शक्यता असते.

महत्वाच्या बातम्या-

जलविष्काराची कमाल; तब्बल 100 हुन अधिक गावात पाणी साठवण

कंगना राजकारणात जाणार का?, ट्रोलर्सच्या या प्रश्नावर अखेर कंगनानं सोडलं मौन; म्हणाली…

आत्मनिर्भर भारताचं पहिले यश; भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी

ऐकावं ते नवलंच! चंद्रावर राहण्यासाठी वैज्ञानिकांनी बनवली मानवाच्या मूत्रापासून वीट; सविस्तर जाणून घ्या

झेंडा मागे मग सल्यूट कोणाला मारतायत मुख्यमंत्री, समोर साबीआय दिसली की काय?- निलेश राणे