कोरोना मुळापासून संपणार! महाराष्ट्रातील डॉक्टरने कोरोनावर शोधला ‘हा’ जालीम उपाय

नवी दिल्ली | कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून देशात थैमान घातलं होतं. या महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे.

त्यातच देशातील एका डॉक्टरने दावा केला आहे की, ते कोरोना रूग्णाला पुर्णपणे ठिक करू शकतात. इतकंच नव्हे तर त्यांनी स्व:त हजारो लोकांना कोरोनामुक्त केल्याचा दावा देखील केलाय.

महाराष्ट्रातील डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी अशा प्रकारचा कारनामा केला आहे. बावस्कर यांनी केलेल्या शोधाला इंटरनॅशनल जर्नलमध्ये सुध्दा जागा मिळवली आहे.

पहिल्यापासूनच उपलब्ध असलेल्या सिंथेटिक मेथिलीन ब्लू नावाच्या मीठचा वापर करून हा शोध लावला आहे. या मिठाच्या केवळ वासानेच रूग्ण बरा होतो. याच शोधाचा वापर करून डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी हजारो लोकांचा इलाज केला आहे.

प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. बावस्कर म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान ज्यांना श्वसनाचा त्रास होता अशा रूग्णांना मेथिलीन ब्लूच्या वासानेच ठिक केलं होतं.

त्या रूग्णांवर कोणत्याच औषधाचा परिणाम होत नव्हता, पण या मिठामुळे ते पुर्णपणे ठिक झाले आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये सुध्दा 200 पेक्षा जास्त लोकांना या मिठाच्या वापराने ठिक करण्यात मला यश आलं आल्याचं त्यांनी सांगितलं.

डॉ. बावस्कर याचे हे काम जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअरमध्ये प्रसिध्द झाले आहे. आश्चर्याची बाबही आहे की ज्या रूग्णांना या मिठाचा वास देण्यात आला होता त्यापैकी एकाही रूग्णाचा जीव गेला नव्हता, असाही दावा डॉ. बावस्कर यांनी केला आहे.

या मिठाचा उपयोग मलेरियाच्या औषधांमध्येही केला जातो आणि याची किंमत पण खुप कमी आहे. फक्त 10 रूपयात 5 एमएल मेथिलीन ब्लू मिळते. पण याच्या जास्त वापराने त्याचे विषात रुपांतर होते. त्यासाठी याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे असं ही, डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

EPFO कडून खातेधारकांना अलर्ट जारी, तुम्हीही ‘या’ चुका करू नका

“…त्यामुळे भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही”, अमित शहांनी सांगितलं कारण

बिल गेट्स यांनी दिला जगाला धोक्याचा इशारा, म्हणाले “कोरोनानंतर आता…”

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोदी सरकारचा दणका