‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

पुणे | अंगावर शहारे आणणारी थंडी आता कमी व्हायला लागली आहे. थंडी कमी होत असताना समांतर पद्धतीनं तापमानाचा पारा चढताना पहायला मिळत आहे.

किमान तापमानाचा पारा पुण्यासह राज्यात काही भागात वाढत आहे. गेल्या तीन-चार दिवसात पुणे आणि संलग्न परिसरात तापमान वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या पाच-सहा दिवसात पुण्यात आणि इतर भागात तापमान वाढल्याची नोंद आहे. पुण्यात तर पारा 20 अंशाच्या पार गेला आहे. परिणामी हवामान बदलामुळं परिसरात आता पावसाची शक्यता आहे.

उन्हाचे चटके सहन केल्यानंतर तापमानाचा पारा 10 अंश सेल्सियसपेक्षा खाली आला आहे. असं असलं तरी येत्या काही दिवसांमध्ये उन्हाचे चटके बसू शकतात असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

पुण्यातील एनडीए भागात सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं आहे. 9.8 अंश इतकं तापमान या भागात नोंदवण्यात आलं आहे. तर इतर भागात तापमान सरासरी 12-13 अंशापर्यंत नोंदवलं आहे.

पाच-सहा दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नाही. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. परिणामी काळजी करण्याचं कारण नाही.

राज्यात पावसाचा अंदाज नसला तरी उत्तर भारतात मात्र पावसासाठी पोषक हवामान तयार होताना दिसत आहे. देशातील अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या राज्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. परिणामी हिमाचल प्रदेश, लेह लडाख, गिलगीट बाल्टीस्थान, या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पाहा ट्विट-

महत्त्वाच्या बातम्या – 

EPFO कडून खातेधारकांना अलर्ट जारी, तुम्हीही ‘या’ चुका करू नका

“…त्यामुळे भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही”, अमित शहांनी सांगितलं कारण

बिल गेट्स यांनी दिला जगाला धोक्याचा इशारा, म्हणाले “कोरोनानंतर आता…”

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोदी सरकारचा दणका

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना न्यायालयाचा झटका, सुनावली ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा