डॉक्टरांनी सिद्धार्थला ‘या’ गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं परंतु…

मुंबई | बिग बॉसच्या 13व्या पर्वाचा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सिध्दार्थचा अकाली मृत्यू हा मनोरंजन विश्वासह त्याच्या चाहत्यांसाठी देखील मोठा धक्का आहे.

सिद्धार्थला व्यायामाची खूप जास्त आवड होती. सिद्धार्थ 40 वर्षांचा होता. त्याने नेहमी स्वतःला फिट ठेवले. तो नियमितपणे जीम करत होता. तसेच तो खूप काळजीपूर्वक डाईट देखील घेत होता. परंतु तरी देखील सिध्दार्थने अचानक एक्झिट घेतल्याने सर्वांना मोठा धक्का बसला होता.

निधनापूर्वी काही महिने सिद्धार्थ आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे गेला होता. यावेळी डॉक्टरांनी सिध्दार्थला काही महत्वाचे सल्ले दिले होते. डॉक्टरांनी सिध्दार्थला वर्कआऊट कमी करण्यास सांगितलं होतं.

डॉक्टरांनी सल्ला देऊन देखील सिद्धार्थने वर्क आऊट चालूच ठेवला. तो नियमितपणे 3 ते 4 तास व्यायाम करत होता. डॉक्टरांचा सल्ला न ऐकणे, हे देखील सिध्दार्थच्या मृत्यूमागील एक कारण आहे, असं काही लोक बोलत आहेत.

हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सिद्धार्थचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. परंतु सिद्धार्थ एवढा फिट असूनही त्याला कसा काय हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, अशाप्रकारचे सवाल उपस्थित केले जात आहेत.

अशातच सिद्धार्थचा जिम ट्रेनर सोनू चौरसिया याने एक वक्तव केलं आहे. सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. सिद्धार्थला मी गेल्या दीड वर्षापासून ट्रेनिंग देत होतो. तो फिट होता आणि तो त्याच्या फिटनेसबाबत खूप जागृकही होता. त्याचबरोबर तो जिममध्ये खूप हार्डवर्क करत असल्याचं सोनू यांनी सांगितलं.

तसेत सिद्धार्थ कधीच तणावामध्ये राहत नव्हता. तो नेहमी आनंदी असायचा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवणारा माणूस होता. आम्ही रोज 10.30 वाजता जिममध्ये भेटायचो, असं देखील सोनू यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शहनाजच्या मांडीवर सिद्धार्थने घेतला अखेरचा श्वास?

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजची अवस्था पाहून तुम्हाला देखील अश्रू अनावर होतील, पाहा फोटो

‘या’ बड्या अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता सिद्धार्थ शुक्ला

‘या’ सीनमुळे नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला स्लट शेमिंगला सामोर जावं लागलं

पाण्यात उडी मारायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ