डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर पालटला; आता म्हणतात, ‘नरेंद्र मोदी महान नेते!’

नवी दिल्ली |  हायड्रोक्सीक्लोरीक्वीन गोळीवरच्या निर्बंधावरून भारताला धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर अचानक पालटला आहे. नरेंद्र मोदी अतिशय चांगले आणि महान नेते आहेत, असं ते म्हणाले आहेत. फॉक्स न्यूजला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

ट्रम्प यांच्या धमकीनंतर नरेंद्र मोदी यांनी हायड्रोक्सीक्लोरीक्वीनसह 24 औषधांवरची निर्यातबंदी उठवली. मोदींच्या या भूमिकेचं कौतुक करताना ट्रम्प यांनी मोदींची स्तुती केली आहे. ते खरोखरच भारताचे महान नेते नेते असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

करोना व्हायरसवर उपचारासाठी मी 2 कोटी 90 लाखांपेक्षा जास्त डोस खरेदी केले आहेत. नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फोनवरुन मी चर्चा केली. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी मला अमेरिकेला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतातून भरपूर औषधे येणार आहेत. तुम्ही निर्बंध हटवू शकता का? असं मी मोदींना विचारलं होतं, असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, काल मात्र भारताला धमकी देताना त्यांनी म्हटलं होतं की, “अमेरिकेला सध्या भारताच्या मदतीची आवश्यकता आहे. अशा वेळी भारताने औषधांवर निर्बंध घातले आहेत. मात्र जर भारताने आता मदत केली नाही तर त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आणि का भोगायला लागू नयेत??”

महत्वाच्या बातम्या-

-तरुण मारहाण प्रकरणी भाजपनं जितेंद्र आव्हाडांना विचारले ‘हे’ चार प्रश्न!

-अखेर मारहाणीच्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी मौन सोडलं…

-मुख्यमंत्र्यांनंतर आता छगन भुजबळांच्या निवासस्थानाजवळ आढळला कोरोनाचा रूग्ण

-चला चूल पेटवूया; राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिला स्तुत्य कार्यक्रम

-कोरोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची मोठी योजना!