लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय

मुंबई |  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या तसंच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिलपर्यंतचं अ‌ॅडव्हान्स बुकिंग रेल्वेने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीव रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 30 एप्रिलपर्यंत रेल्वे धावणार नाहीत.

15 तारखेला केंद्राने जारी केलेला लॉकडाऊन संपणार होता. त्यामुळे रेल्वेने अ‌ॅडव्हान्स बुकिंग सुरू केलं होतं. मात्र गेल्या आठवड्याभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाल्याने आता रेल्वेने सावध पाऊल टाकलं आहे.

दरम्यान, ज्या प्रवाशांनी अ‌ॅडव्हान्स बुकिंग केलं आहे त्यांना त्यांचे पैसे परत दिले जातील, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. 30 एप्रिलपर्यंत कोरोनाच्या रूग्णांची संख्या पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर पालटला; आता म्हणतात, ‘नरेंद्र मोदी महान नेते!’

-तरुण मारहाण प्रकरणी भाजपनं जितेंद्र आव्हाडांना विचारले ‘हे’ चार प्रश्न!

-अखेर मारहाणीच्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी मौन सोडलं…

-मुख्यमंत्र्यांनंतर आता छगन भुजबळांच्या निवासस्थानाजवळ आढळला कोरोनाचा रूग्ण

-चला चूल पेटवूया; राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिला स्तुत्य कार्यक्रम