आम्हाला तुमची गरज नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला सुनावलं

वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल करत आपल्याला चीनची गरज नसल्याचं म्हटलं आहे. चीनने अमेरिकेच्या 75 अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

चीनने अमेरिकेच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत चीनमधील अमेरिकन कंपन्यांना आपला व्यवसाय गुंडाळण्याचे आदेश दिले आहेत.

आम्ही चीनसोबत व्यवहार करून अब्जावधी डॉलर्स गमावले आहेत. चीन आमच्या बौद्धीक संपदेचा वापर करून दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई करत आहे. परंतु आता आम्ही तसं होऊ देणार नाही. आता आम्हाला चीनची गरज नाही. चीनशिवाय आम्ही उत्तम स्थितीत राहू, असं ट्रम्प यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे.

दरम्यान, चीनमधील अमेरिकन कंपन्यांनी आपला व्यवसाय पुन्हा अमेरिकेत आणावा, असे आदेश मी देत आहे. त्यांनी तात्काळ अन्य देशांचा पर्याय शोधावा. अमेरिकेसाठी ही मोठी संधी आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-