डोनाल्ड ट्रम्पंना मोठा दणका; पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर

नवी दिल्ली | पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पसाठी हा मोठा झटका आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅट्सचं वर्चस्व आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या  229 लोकप्रतिनिधींनी प्रस्तावाच्या बाजूने मत दिले तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 197 प्रतिनिधींनी त्यांच्या बाजूने मत दिलं. त्यामुळे हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅट्सचं वर्चस्व असलं तरी सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाचं बहुमत आहे. त्यामुळे तेथे हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता फार कमी आहे. महाभियोगाला सामोरे जाणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे तिसरे अध्यक्ष ठरले आहेत.

दरम्यान, ट्रम्प यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. 2020 साली होणाऱ्या राष्ट्राध्यच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या-