हे सरकार पडावं म्हणून अनेक जण देव पाण्यात ठेवून बसलेत- धनंजय मुंडे

नागपूर |  आज भाजपला वाटतंय की काहीतरी होईल आणि आम्ही पुन्हा येऊ. महाआघाडीचं सरकार पडावं यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहेत. उम्मीद पे दुनिया कायम है, उम्मीद रखो लेकीन आनेवाले 15 साल तक, कारण महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन व्हावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले आहेत. ते विधिमंडळात बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे ऐतिहासिक कर्जमाफीचा गाजावाजा केला. ऑनलाईन फॉर्म माथी मारत माझ्या शेतकऱ्याला तासंतास लाईनीत उभं केलं. जाचक अटी लादल्या. मात्र कर्जमाफी काही झाली नाही. त्याचाच परीणाम म्हणून आज भाजपला विरोधी बाकावर बसावे लागत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

या महाविकास आघाडी सरकारला शेतकरी, बेरोजगार तरूण, असुरक्षित मायभगिनी, समाजातील प्रत्येक वंचित घटकांच्या कल्याणासाठी झटायचं आहे. लोकांसाठी झटणं हा जर स्वार्थपणा असेल तर मी छातीठोकपणे सांगतो की हो आम्ही स्वार्थी आहोत, असं मुंडे म्हणाले आहेत.

सत्तेत येण्यासाठी भाजपने केंद्राच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्थाचा वापर केला. लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या भाजपा सरकारला खरी लोकशाही काय असते हे महाविकास आघाडीच्या सरकारने दाखवून दिले आहे. दिलेला शब्द पाळला नाही तर बहुमत मिळूनही पायउतार निश्चित असतो, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-