डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात ‘या’ शब्दांचा उच्चार करताना चुकले; सोशल मीडियावर चर्चा

अहमदाबाद |  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले. पंतप्रधान मोदींनी त्यांचं मोठ्या आदराने स्वागत केलं. साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे मोटोरा स्टेडियममध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी भारताची विविधतेत असलेली एकता, भारतीय सण, भारतीय खेळ, भारताचे महामानव यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला. परंतू ते आपल्या भाषणात काही शब्द उच्चारताना अडखळे किंबहूना त्यांनी त्या शब्दांचा चुकीचा उच्चरा केला.

महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर, स्वामी विवेकानंद, चहावाला, वेदाज, शोले या शब्दांचा उच्चार करताना डोनाल्ड ट्रम्प चुकले. याची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहे.

स्वामी विवेकानंद असं त्यांना म्हणायचं होतं. पण त्यांनी स्वामी विवेकामनन असं म्हटलं. सचिन तेंडुलकरचं नाव घेताना त्यांनी सूचिन तेंडुलकर असं घेतलं. मोदींची स्तुती करताना त्यांना चहावाला असं म्हणताचं होतं परंतू ते चीवाला असं म्हटलं. वेदाज या शब्दाचा उच्चार त्यांनी वेस्तास असा केला.

दरम्यान, भारताने केलेला पाहुणचार आहम्ही नेहमी लक्षात ठेवू. भारतासाठी आमच्या अंतःकरणात विशेष स्थान आहे, अशाही भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकारने जाहीर केली कर्जमाफीची पहिली यादी; यादीत 15 हजार लाभार्थ्यांची नावे

-अमेरिका भारताला पृथ्वीवरचं सर्वात शक्तिशाली लष्करी शस्त्र उपलब्ध करुन देणार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

-भारतभूमीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट पाकिस्तानला इशारा; पाहा काय म्हणाले ट्रम्प-

-मोदींच्या नेतृत्वात भारत गरीबीतून बाहेर पडतोय- डोनाल्ड ट्रम्प

-एक चहावाला देशाचा पंतप्रधान होणं हे खूप कौतुकास्पद; ट्रम्प यांची मोदींवर स्तुतीसुमनं