ठाकरे सरकारने जाहीर केली कर्जमाफीची पहिली यादी; यादीत 15 हजार लाभार्थ्यांची नावे

मुंबई |   आज ठाकरे सरकारने शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 68 गावांतील 15 हजार 358 लाभार्थ्यांची आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर केली गेली आहे.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केल्यानंतर नगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यांतील दोन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

कर्जमाफीनंतर सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. कर्जमाफीची दुसरी यादी 28 तारखेला जाहीर केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

पहिल्या सरकारची कर्जमाफीची योजना अजूनही सुरू आहे. त्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण करूनच सरकार पुढे जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-अमेरिका भारताला पृथ्वीवरचं सर्वात शक्तिशाली लष्करी शस्त्र उपलब्ध करुन देणार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

-भारतभूमीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट पाकिस्तानला इशारा; पाहा काय म्हणाले ट्रम्प-

-मोदींच्या नेतृत्वात भारत गरीबीतून बाहेर पडतोय- डोनाल्ड ट्रम्प

-एक चहावाला देशाचा पंतप्रधान होणं हे खूप कौतुकास्पद; ट्रम्प यांची मोदींवर स्तुतीसुमनं

-गरिबी दिसू नये म्हणून बांधलेली भिंत मोदींच्या अकार्यक्षमतेचे स्मारक- बाळासाहेब थोरात