…तर मला अनेक गोष्टींसाठी नोबेल पुरस्कार मिळाला असता- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन  | शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळणं हा आपल्यावरील अन्याय असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत द्वीपक्षीय बैठकीदरम्यान बोलताना ट्रम्प यांनी आपली भावना व्यक्त केली.

जर नोबेल समितीने निष्पक्षपणे पुरस्कार दिले असते तर आज मला अनेक गोष्टींसाठी नोबेल पुरस्कार मिळाला असता, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

2009 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रतिष्ठीत शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरविल्याबद्दल ट्रम्प यांनी यावेळी आश्चर्यही व्यक्त केले.

ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर लगेचच त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार आपल्याला कशासाठी देण्यात आला हे त्यांना माहिती देखील नव्हते.

दरम्यान, तुम्हाला माहिती आहे का? ओबामांच्या केवळ याच गोष्टीशी मी सहमत आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी ओबामांवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या-