नवी दिल्ली | भारतातील अनेक नागरिक गाडी चालवताना मोबाईल वापरताना दिसतात. यामुळे भारतात दरवर्षी अनेक दुर्घटना घडतात. पण आता जर तुम्ही गाडी चालवताना मोबाईल वापरताना दिसले तर तुम्हाला याचा चांगलाच मोठा दंड भरावा लागेल.
नुकतेच रस्ता परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने वाहन परवान्यातील काही नियमात मोठे बदल केले आहे. आता गाडी चालवताना तुम्ही जर फोनवर बोलताना आढळले तर तुम्हाला ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
त्याचबरोबर या नियमानुसार तुम्ही फोनचा वापर फक्त नेव्हिगेशनसाठीच वापरू शकता, पण फोनवर बोलताना आढळले तर भरभक्कम दंड भरावा लागेल. हा नियम देशभरात १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
रस्ता परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयानुसार, गाडी चालवताना तुमच्या हातात मोबाईल फक्त नेव्हिगेशनच्या उपयोगासाठीच असला पाहिजे. गाडी चालवताना जर मोबाईलवर बोलताना आढळले तर तुम्हाला एक हजार ते पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
मागच्या वर्षी मोटार वाहन अॅक्टमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहे. जर तुम्ही हेल्मेट घातले नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यातच आता या नव्या नियमानुसार आयटी सर्विस आणि इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंगद्वारे देशातील ट्रॅफिकशी निगडित नियम अजून सुधारण्यासाठी हे नियम लागू केले जातील.
१ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या या नियमानुसार आयटी पोर्टलच्या माध्यमातून वाहतूक पोलीसच सर्व वाहन परवाना, ई-चलन आणि वाहन संबंधी सर्व महत्त्वाचे कागदपत्रे सांभाळणार आहे. जर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे तुमचे वाहनसंबंधी कागदपत्रे वैध ठरले तर तुम्हाला कोणतेही कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही आणि तुमच्याकडे त्याची मागणीही करणार नाही.
गाडी चालवताना फोनवर बोलणे, अशा कारणामुळे अनेक दुर्घटना घडताना दिसत आहे. अशा केसेस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही लोक गाडी चालवताना फोनवर बोलतात, त्यामुळे त्यांचे लक्ष भरकटते. यामुळे दुर्घटना घडते. या दुर्घटनेवर काही प्रमाणात आळा घालण्यासाठी मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ही’ निर्माती का ढसाढसा रडू लागली आहे? कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल
ड्र.ग्ज प्रकरणी अडकलेल्या साराच्या मदतीसाठी वडील सैफ अली खान यांनी उचललं ‘हे’ पाऊल
लग्न ते रफींसोबतच्या वादापर्यंत; वाचा लता मंगेशकर यांच्याबद्दल कधीही न वाचलेल्या गोष्टी
निकोलस पूरनने असा डेंजर षटकार वाचवला, हे पाहून जॉन्टी रोड्सनं उठून…