Top news मनोरंजन

‘ही’ निर्माती का ढसाढसा रडू लागली आहे? कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल

मुंबई | बॉलिवूड निर्माती रिया कपूर नेहमीच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांबरोबर गोष्टी शेअर करत असते. रिया कपूरनं पुन्हा एकदा सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांबर एक गोष्ट शेअर केली आहे. रिया कपूर स्वतः ढसाढसा र.डल्याची माहिती रियानं स्वतः सोशल मीडियावर चाहत्यांबर शेअर केली आहे.

रिया कपूर घरातील एक सदस्य आजारी पडल्यानं रिया कपूर ढसाढसा र.डल्याची माहिती समोर आली आहे. रिया घरातील ज्या सदस्याच्या आजारी पडल्यानं र.डली आहे त्याचं नाव रसेल क्रो कपूर असं आहे. रसेल हे रियाच्या कुत्र्याचं नाव आहे. रसेल आजारी पडल्याची माहिती रियानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सांगितली आहे.

रसेल कसा आजारी पडला याचीही माहिती रिया कपूरनं दिली आहे. पहिले दोन दिवस रसेल आजारी पडला होता तेव्हा मी खूप जास्त घाबरली होती. कित्येक महिन्यानंतर मी एका लहान मुलीसारखी रडली आहे. रसेल माझं सगळं काही आहे, असा कॅप्शन रियानं या पोस्टसोबत दिला आहे.

रियानं या पोस्टमध्ये रसेलचे फोटो शेअर करत त्याला जगासमोर सादर केलं आहे. इंस्टाग्रामवरील याच पोस्टमध्ये रियानं रसेलची कपूर कुटुंबातील आगमनाविषयी सुद्धा माहिती दिली आहे.

माझ्या कुटुंबात एक नवीन सदस्य आला आहे. कुटुंबात नवीन आलेल्या या सदस्याचं नाव रसेल क्रु कपूर आहे. रसेल संपूर्ण घरभर धावत असतो. तो सध्या फक्त 55 दिवसांचा आहे आणि रसेल खूप खूप गोड आहे, असं रियानं या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

दरम्यान, रिया कपूर प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. अनिल कपूर यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य अभिनय क्षेत्राशी जोडला गेलेला आहे. अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन यानंही ‘मिर्झिया’ चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं आहे. मात्र, रिया कपूर नेहमीच अभिनय क्षेत्रापासून लांब राहिली आहे. ती केव्हाच अभिनय क्षेत्रात आली नाही.

अभिनय क्षेत्रात न येण्यामागचं कारणही रियानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. अनिल कपूर यांनी रियाला अभिनय क्षेत्रात येण्यापासून रोखलं असल्याचं रियानं म्हटलं होतं. याची सविस्तर माहिती रियानं एका मुलाखतीत दिली होती.

अभिनय क्षेत्रापासून लांब राहण्याचं मुख्य कारण पापा अनिल कपूर हे आहेत. मला अभिनेत्री बनण्यापासून अनिल कपूर यांनी रोखलं होतं, असं रिया कपूरनं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

ड्र.ग्ज प्रकरणी अडकलेल्या साराच्या मदतीसाठी वडील सैफ अली खान यांनी उचललं ‘हे’ पाऊल

‘सुशांत आणि दिशाच्या मृ.त्यूशी ‘या’ व्यक्तीचा थेट संबंध आहे’; सुशांतप्रकरणी युवराजचा धक्कादायक खुलासा!

निकोलस पूरनने असा डेंजर षटकार वाचवला, हे पाहून जॉन्टी रोड्सनं उठून…

‘तू करण जोहरला अडकव, आम्ही तुला सोडून देऊ’; पाहा कुणी केला ‘हा’ धक्कादायक आ.रोप

राहुल तेवतियाने पाच चेंडूत पाच षटकार मारले, युवराज सिंह घाबरून म्हणाला…