‘शिवसेनेसोबत पंगा घेऊ नका, अन्यथा…’; संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई | भाजप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार होते. त्यामुळे राज्यातील वातावरण गरम झालं.

राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालीसा पठनाच्या इशाऱ्यानं मुंबईत शिवसैनिक आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. मुंबईत कोणाताही राडा होऊ नये यासाठी आता खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना 149ची नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत कायदा आणि युव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं कुठलंही काम करु नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

हनुमान चालीसा पठनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक मुंबईला हनुमान चालिस वाचायला गेले. ते आम्हाला हिंदुत्व शिकवतात, हा सर्वात मोठा विनोद आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

बाहेरून आलेल्या अमरावतीच्या लोकांनी शिवसेनेसोबत पंगा घेन नये, अन्यथा महाराष्ट्रात राहणे मुश्किल करू, असा इशाराही राऊत यांनी राणा दाम्पत्यांना दिला आहे.

बंटी आणि बबली पोहोचले असतील तर पोहोचू द्या. हे लोक फिल्मी लोक आहेत. ही स्टंटबाजी, मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आणि भाजपाला आपलं मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज लागत आहे, असं राऊत म्हणाले.

हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व काय आहे हे माहिती आहे. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत, असंही राऊत म्हणाले.

शिवसेनेला ही कालची पोरं हिंदुत्वाचा पाठ शिकवणार का? हे भाडोत्री लोक आहेत. भाजपच्या नेत्यांना काही काम नाही. हे लोक केंद्रातील महागाईवर बोलणार नाहीत, असंही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

  आत्ताची मोठी बातमी! मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, तणावाचं वातावरण

काय सांगता! बंदुकीच्या धाकावर आमिर खानचं 70 लाखांचं घड्याळ लुटलं; CCTV फुटेज समोर

जाॅस द बाॅस! बटलरकडून दिल्लीच्या गोलंदाजांचे वस्त्रहरण, वादळी शतक झळकावलं

भर सभेत अजित पवारांच्या वक्तव्यानं लोकांना हसू आवरेना, म्हणाले…

“राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात नंबर 1 चा पक्ष बनेल”